शिंदखेडा पं.स.कार्यालयात विविध विषयांवर वादळी आमसभा सपंन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील पं स कार्यालयाच्या आवारात आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित करण्यात आली होती. सचिव म्हणून गटविकास अधिकारी देविदास देवरे होते, या वेळी तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा बॅंक, सेंट्रल बँक आदी विभागाचे शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समितीची ही आमसभा हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामुळे ग्रामीण जनतेला आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळते कोरोना काळात बऱ्याच वर्षापासून आमसभा घेतली गेली नसल्याने नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली. यावेळी समस्याग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी वर्गाची तारांबळ झाली होती.
अधिकारी वर्गाची व अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची आमदारांनी यावेळी कान उघडणी केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या विकास रथाची दोन चाके आहेत यापुढे नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी सजग राहून विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. तालुक्यात अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदरांसमोर मांडल्या. यावेळी अनेक विभागांचा आढावा घेण्यात आला ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला.
कांदा चाळीच्याव अनुदान वाढवून मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली यावर तालुका कृषी अधिकारी श्री विनय बोरसे यांनी अनुदान वाढवून दीड लाख रुपये मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. वीज वितरण कंपनीच्या ढसाळ कारभाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधी व जनतेला मिळत असलेल्या उद्धट वर्तणूक वर्तणुकीचे संतप्त पडसाद उमटले. आमसभेत नागरिकांचा रोष पाहून आमदार जय कुमार रावल यांनीसुद्धा नरडाना सबस्टेशन चे अभियंता जोशी यांना खडे बोल सुनावले अखेर अभियंता जोशी यांनी भर सभेत माफी मागितली.
तहसील कार्यालयातून शिधापत्रिका मिळवण्यासाठी अनेक महिने वाट पहावी लागत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. नवीन रेशन कार्ड, धान्य वाटप दुकानदारांची मनमानी आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन संबंधित दोषींवर कारवाईच्या सूचना आमदार ने दिल्या.
१) ऊर्जा विभाग:
महावितणाला नागरिकांनी समस्यांचा दिला शॉक
शिंदखेडा येथील महावितरण कंपनीचे उपअभियंता विनय बोरसे यांना धारेवर धरत शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. शिंदखेडा येथे ३३ केव्ही सबस्टेशन एम एस ई बी चे सध्या सुरू आहे ते १३२ केव्ही होऊन शिंदखेडाचे वीज वितरणाचे समस्यांचे पूर्ण निराकरण करावे तसेच होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करावी प्रकाश चौधरी यांनी मत मांडले. सोनशेलु येथे २०२१ ला प्रस्ताव मंजूर झाला आहे पण अजून रोहित्र त्यात बसलेली नाही. नागरिकांनी सोलर सबस्टेशनची मागणी केलीआहे. शिंदखेडा शहरात २१ कोटीचे पाणीपुरवठ्यासाठी सुकवड येथील सब स्टेशनला ४०,००० लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नरडाना सबस्टेशन वरून मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. परंतु तेथे मात्र दुजाभाव केला जातो असा आरोप केला गेला. हातनूर गावाजवळील दीड किलोमीटर अंतरावर आदिवासी पाड्यांमध्ये रोहित्र बसवण्याची मागणी झालेली आहे परंतु तेथे अजूनही रोहित्र दिले गेले नाही. तसेच देगाव यरथील खासगी सौर ऊर्जेच्या स्टेशन येथे ६० मेगावॅट वीज तयार होते परंतु ती शिंदखेडा तालुक्याला न देता मुंबईला विकली जाते.
२)आरोग्य विभाग :
आरोग्य विभागातील कोविड मध्ये लावलेल्या १) विठ्ठल बारकु पाटील २) नितीन भावसार यांचा गाड्यांचा पैसा हा मिळाला नसल्यामुळे वैद्यकीय अधिकारी ही पैसो देत नाही. असे गाडी वाल्यांनी ग्रामसभेमध्ये त्यांच्यावर आरोप केले तसेच पैसे मिळवण्यासाठी अक्षरश खो देत आहेत. जीव धोक्यात घालून काम करणार्यांना असे वाऱ्यावर सोडू नका त्यांना मदत करा असा समज आ जयकुमार रावल यांनी दिला.
३)बँकिंग क्षेत्र:
डी डी सी सी धुळे यांच्यामार्फत पंधरा दिवसात ३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले तसेच विकास सोसायटी सुराय अवसायनात निघाली असून तिला संजीवनी देऊन जिवंत करता येईल असे गीते साहेब यांनी आश्वासन दिले. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून ४.२ करोडो रुपयाचा कर्जवाटप झाले आहेत. अशी माहिती विनोद रंगरे या प्रतिनिधीने दिली. हातनुर येथील विकास सोसायटी वर वीस लाख रुपये कर्ज होते सोसायटीची ४५ एकर मालकीची जमीन आज पर्यंत कुठे आहे? त्याचा तपास नाही की कोणी गिळंकृत केली तेही कळायला मार्ग नाही? वीस ते पंचवीस वर्षांपासून ती जमीन नेमकी कोण वापर करत आहे असा प्रश्न – ग्रा पं सदस्य हातनूर वाल्मिक दंगल पाटील यांनी केला.
४)बांधकाम विभाग :
पी एम जि एस वाय मधून अभियंता चेतन वाणी यांनी २७ कामे मंजूर असून १६१ किमी रस्ता मंजूर झालेला आहे. ए डी पी मधून ५ पूल मंजूर झालेली आहेत. धुळे जिल्ह्यासाठी १४२ पैकी २६ किमी शिंदखेडा साठी रस्ते मंजूर झालेली आहेत ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने दिले जाते अशी माहिती दिली. आमसभेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जनतेला व राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांना आपल्या गावातील परिसरातील अडचणी व समस्या सोडविण्याचे एक व्यासपीठ मिळते मात्र यावेळी अनेक, जि.प. व प.स सदस्य अनुपस्थित असल्याने जनतेने आश्चर्य व्यक्त केले आहे, याउलट आपल्या गट गणांच्या समस्या या माध्यमातून मांडता आल्यास त्या परंतु लोकप्रतिनिधींनी या आमसभेला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसले.
आमसभेच्या ठिकाणी खालील विभागातील अधिकारी उपस्थित होते गटविकास अधिकारी डी एम देवरे, तहसीलदार सुनील सैंदाने, आरोग्य अधिकारी निलेश पाटील, दोंडाईचा मुख्य अधिकारी प्रवीण निकम, शिंदखेडा मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलीस निरीक्षक दोंडाईचा दुर्गेश तिवारी, पोलीस निरीक्षक सुनील बाभड, पो नि नरडाना मनोज ठाकरे, आमसभेला तालुक्यातील जि प सभापती कुसुमताई निकम, पं स सभापती अनिता राकेश पाटील, उपसभापती राजेश पाटील, नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, जि प सदस्य विरेंद्र गिरासे, प्रतिनिधी जि प सदस्य डी आर पाटील, कामराज निकम, नारायण पाटील, पं स सदस्य प्रवीण मोरे, पं स सदस्य विशाल पवार, पं स सदस्य गिरीश देसले, राकेश पाटील, जि प सदस्य पंकज कदम तालुक्यातील जि प व पं स सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व राजकीय पदाधिकारी तालुक्यातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.