ग्राहकांना विजेचे महत्व कळले पाहिजे अभियंता चव्हाण यांचे मत
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) आज सर्वत्र विजेच्या प्रश्नावर सर्वजण आक्रमक होतांना दिसतात. कधीही ग्राहकांनी वैचारिक स्वातंत्र्याचा विचार केला नाही बऱ्याच ठिकाणी दिवसा ढवळा विजेचे स्ट्रीटलाइट व घरातील टीव्ही पंखे जवळ कोणीही नसताना उपकरणे चालू असतात.
यासंदर्भात ग्राहक कधी विचार बदलणार आहेत फक्त अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने विजेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत भडगाव पाचोरा पारोळा येथील डिव्हिजन ऑफिसर अभियंता रामचंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
ते लोण पिराचे व कोठली सप्टेशन कार्यक्रमांतर्गत विषयावर बोलत होते यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोठली तर लोन पिराचे सप्टेशन चार किलोमीटर्स कार्यक्रम हा एक महिन्याचा पूर्ण करण्याची ग्वाही कॉन्ट्रॅक्टदार यांनी दिली.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल नेहरू पाटील, दीपक जाधव, भुरा आप्पा कार्यकारी अभियंता सुनील साळुंखे, पाटील साहेब लाईनमन रवींद्र महाजन, नितीन दाभाडे, जितेंद्र चौधरी, गौरव पाटील, वीरभान महाजन, सचिन पाटील ज्ञानेश्वर पाटील अधिकारी आदी उपस्थित होते.