धुळे मनपाला पंतप्रधान आवास योजनेसाठी लागणारा निधी प्राप्त झाल्याने योजनेला चालना मिळेल : गजेंद्र पाटील
धुळे : वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांच्या पाठपुरव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या मंजुर टिपीआर क्रमांक तीन आणि चार साठी लागणारा 4 कोटी 92 लाख 50 हजारांचा निधी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयाकडून धुळे मनपाला पाठविल्याबद्दल गजेंद्र पाटील यांनी म्हाडाचे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे काम तब्बल तीन वर्षापासून रखडले होते तरी आता निधी मिळाल्याने सदर योजनेला चालना मिळेल असे मत पत्रकार गजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थानी अर्ज भरुन मनपाकडे दिले होते त्यां अर्जाची तपासणी करुन गरजु लाभार्थाचे प्रस्ताव पुढील कार्यावाहीसाठी म्हाडा कार्यालयाकडे पाठविण्यांत आले होते. त्यांना तब्बल दोन अडीच वर्षाचा कालावधी लोटला गेल्यांचे पाहून शेवटी वरखेडे गावाचे पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी थेट वांद्रे ( मुंबई ) येथील कार्यालयाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पंतप्रधान आवास योजनेच्या समस्येबाबत सांगितले तेव्हा तेथील अधीकारीनी मनपाकडून प्रस्ताव आले आहेत दिल्लीच्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजुर होतील असे सांगितले होते. मी आपल्या समस्येची दखल घेत दिल्लीच्या बैठकीत जातीने प्रस्ताव मंजुर घेवू असे सांगत त्यांनी टिआर क्रमांक तीन आणि चार मंजुर करुन घेतल्यांचे कळविले होते आणि लाभार्थाची नावे वेब साईटवर टाकण्यांचे मनपाला कळविले होते.
परंतु पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थाचा टिपीआर मंजुर झाला मात्र निधी अभावी त्याला चालना मिळत नव्हती असे कळल्यावर पुन्हा पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी वांद्रे येथील कार्यमग्न अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पंतप्रधान आवास योजनेचा टिपीआर मंजुर असून मात्र निधीअभावी त्यांचे काम रखडले आहे असे सांगितले असता त्यांनी सांगितले की मी संबंधीताकडून माहिती घेतो आणि जेवढ्या लवकर होईल तेवढे लवकर निधी पाठविण्यांचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले मग त्यांनी त्यांच्या विभागाकडून माहित घेत आणि धुळे मनपाला काही सुचना केल्या मनपाला केलेल्या सुचनाची पुर्तता झाल्याबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी लागणारा निधी पाठविण्यांचे मार्गी लागले आहे.
तरी दि 25 एप्रिल 2022 सोमवार रोजी ब्यान्नव लाख पन्नास हजार तर त्यांनंतर दोन दिवसानी पुन्हा चार कोटी रुपयाचा निधी धुळे मनपाला पाठविण्यांत आला आहे आणि तो धुळे मनपा पंतप्रधान आवास योजना विभागाला प्राप्त सुध्दा झाल्याचे सदर विभागाकडून सांगण्यांत आले त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेला झालेला विलंब आता निधी प्राप्त झाल्यांने चालना मिळेल.