आम्ही मंदिराबाहेर दंडे घेऊन रखवाली करणारी माणसं : मोहन भागवत
अमरावती (वृत्तसंस्था) धर्मपीठावर बसने हे औचित्य भंग आहे, धर्मपिठावर कुणाचे पीठाधीपती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही. मंदिराच्या आत आमचं काही काम नसून, मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन रखवाली करण्याचं आमचं काम आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagawat) म्हणाले.

अमरावती येथे भानखेडा स्थित संत कंवर धामरमध्ये गद्दीनशिणी समारोह समारंभ पार पडला. यावेळी मोहन भागवत यांनी आपले परखड मत मांडले. ‘मी संघाचा सरसंघचालक आहे, मी सरकारमध्ये जात नाही, सरकारने एकच गोष्टी माझ्यावर थोपवली ती म्हणजे सरकारने दिलेली सिक्युरिटी. परंतु जेव्हा मी समाजात जातो आणि काही लोक मला काही मागणी करतात तेव्हा मी ते सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. सिंधी बांधवांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सिंधी विद्यापीठाची मागणी केली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता व ‘रकार’ म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतं मग ते सरकार कोणतेही असो सरकारला समाजाच्यासोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तेच तोपर्यंत सरकार राहू शकते असे.संपुर्ण समाजाने एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते. वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगलं बनावं, असं मतही मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

तसंच, धर्मपीठावर बसने हे औचित्य भंग आहे, धर्मा पिठावर कुणाचे पीठाधीपती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही, मंदिराच्या आत आमचं काही काम नसून,आम्ही लोक मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन रखवाली करण्याचा आमचं काम आहे. मंदिराच्या आतमधील गोष्टी आमच्या मर्यादेत नाही, असंही मोहन भागवत म्हणाले.




