महाराष्ट्र
आरटीओतर्फे कार्यालयात घेण्यात येणारा मासिक शिबिर दौरा वरणगाव विश्रामगृह येथे पडला पार
भुसावळ (प्रमोद बावस्कर) तालुक्यातील वरणगाव शहरात शासकीय विश्रामगृह येथे टू व्हीलर मासिक शिबिर दौरा घेण्यात आला.
यावेळी शहरातून व ग्रामीण भागातून टुव्हीलर शिकाऊ 24 अनुज्ञप्ती 170पक्के वाहन चालवण्याचे अनुज्ञप्ती साठी चाचण्या घेण्यात आल्या तसेच वाहन पुनरनोदनी कामकाज करण्यात आले RTO जळगाव कार्यालयामार्फत सौरभ पाटील (मोटर वाहन निरीक्षक), निलेश झाडे (सहा मोटर वाहन निरीक्षक), ऋषिकेश महाले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी कामकाज पाहिले. अशा या स्तुत्य उपक्रमाने RTO च्या मासिक शिबिराद्वारे ग्रामीण परिसरातील युवा वर्ग व इतर नागरिकांना याचा मोठा लाभ मिळत असून व वेळेचीही बचत होत असून परिसरामधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.