ॲड.नरेंद्र मराठेंच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्यात शुभेच्छा
साक्री (प्रतिनिधी) पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र उत्तमराव मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज दि. 25 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस सुरेश सोनवणे, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरण शिंदे, धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा. नरेंद्र तोरवणे, राष्ट्रवादी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गिरीश नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य विजय भामरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, पिंपळनेर ग्रामपालीकेचे उपसरपंच विजूनाना गांगुर्डे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरसाठ, साक्री तालुका राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.विलास देसले, साक्री तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय सोनवणे, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.वाय.पी. कासार, राष्ट्रवादी सेवादल तालुका अध्यक्ष ॲड.सुनील नांद्रे, साक्री तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भैय्यासाहेब साळवे, मालपूरचे माजी सरपंच पंकज भामरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जब्बार मन्सूरी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे करीम शहा, पंचायत समिती सदस्या रूथाताई बिलकुले, पंचायत समिती सदस्या प्रमिलाताई ठाकरे, पंचायत समिती सदस्या मंगलाताई भामरे, पंचायत समिती सदस्या कमलबाई थैल, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस सतीष बोरसे, दिलीप पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मनीष सोनवणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुनील मोहिते, हरिष मंडलिक, कार्तिक पिंपळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रांजल आहिरराव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष गितेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील आदी उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तदाते उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी सांगितले की कोणताही बडेजाव न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारसरणीनुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वानुसार समाज उपयोगी कार्य व्हावे अशी इच्छा उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखविली होती. त्यानुसार रक्तदान हे सर्वात मौल्यवान दान आहे म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जावा त्यानुसार आयोजकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
याप्रसंगी विविध स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यात प्रामुख्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे, साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक सुमित नागरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, पंकज भामरे, मनसेचे धीरज देसले, सुनील देसले, डॉ. घनश्याम अकलाडे, डॉ.राहुल देवरे, डॉ.अतुल देवरे, डॉ. विवेक जाधव, डॉ.देवेंद्र देवरे, आष्टाणेचे माजी सरपंच राजेंद्र देवरे, कावठेचे माजी सरपंच रवींद्र बोरसे, कावठेचे माजी उपसरपंच निलेश ससले, तसेच समाजातील अनेक मान्यवर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या वाढदिवसानिमित्त तब्बल एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान करून साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांना शुभेच्छा दिल्यात. त्या सर्व रक्तदात्यांचे साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी शतशः आभार व्यक्त केले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी सतीष बोरसे, दिलीप पवार, मनिष सोनवणे, सुनील मोहिते, विजय पाटील प्रांजल आहिरराव, मिलिंद पाटील आणि जिवन ज्योती ब्लड बँक, धुळे यांनी परिश्रम घेतले.



