वैजापूर तालुक्यातील माळी सागज येथे मोफत कचराकुंड्या वाटप.
दिनांक : २५ जुलै २०२२
वैजापुर:प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
वैजापुर येथील माळीसागज येथे डॉक्टर राजू डोंगरे यांच्या हस्ते गावामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा मध्ये डॉक्टर डोंगरे यांनी मोफत कचराकुंड वाटप केले .
केंद्र शासन प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान स्वच्छ भारत मिशन स्वच्छ गाव स्वच्छ शाळा या योजनेमध्ये सहभागी नागरिकांना डोंगरे यांच्या हस्ते मोफत कचराकुंड वाटप करण्यात आले तसेच माळी सागज मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला फुलहार घालून पूजन करण्यात आले व डॉक्टर डोंगरे यांनी कॅश स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज परिसरात सुशोभीकरणासाठी अकरा हजार रुपये गावकऱ्यांच्या हाती देण्यात आले.
उपस्थितीत सरपंच शरद पवार चेअरमन मयूर फाळके किशोर पवार मुख्याध्यापक करांकाळ सर वेननाथ फाळके राजू डरे शरद गाडेकर दिनकर पवार दीपक गाडेकर वाल्मीक रोटे आप्पासाहेब पवार आदी उपस्थितीत होते.