केन्द्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथील दहावी बारावी चा निकाल प्रशंसनीय.
शुक्रवारी लागला सीबीएसई दहावी व बारावीचा निकाल.
दिनांक:२५ जुलै २०२२
प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान. भुसावळ: सीबीएसई दहावी व बारावी चा निकाल ची शुक्रवारी आला असुन दहावी व बारावी च्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी हर्षोल्लास साजरा केला जात असुन पालकांपासुन नातेवाईकांपर्यंत तोंड गोड केले जात आहे.
केन्द्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ चा केन्द्रीय उच्चमाध्यमिक व माध्यमिक शिक्षा मंडळ द्वारे आयोजित परीक्षा चे निकाल प्रशंसनीय असुन इ. १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी देवेश्री पाटील हिने ९४℅ अंक मिळवुन शाळेत प्रथम क्रमांक पटकविला आहे.
तर १२ वी काॅमर्स शाखेत दीपक शुक्ला यांने ९०.२℅ अंक मिळवुन प्रथम स्थान प्राप्त केले आहे.
१० वी वर्गात अभिजीत आनंद याने ९६.६℅अंक मिळवुन शाळेत प्रथम स्थान मिळवले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रभारी प्राचार्य श्री नितीन उपाध्याय व केन्द्रीय विद्यालय आयुध नीर्माणी भुसावळ तर्फे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.