महाराष्ट्र
बोदवड येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथील प्रभाग क्रमांक दोन मधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सकाळी ढोल ताशाच्या गजरात पूर्ण शहरांमधून मोठ्या संख्येने काढण्यात आली. त्यावेळी समाजातील सर्व मान्यवर तसेच नुकतीच नगराध्यक्ष झालेले आनंदा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, भरत पाटील, दिनेश माळी, संजय वराडे, सुनील बोरसे, सईद बागवान, असे अनेक मान्यवर जयंती मध्ये उपस्थित होते.