नोंदणीकृत कारखाने असून सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री
बारामती (प्रतिनिधी) ॲग्रो साखर कारखाना ऊस तोडणीसाठी आठ ते दहा हजार रुपये लागतात. कारखान्याची कर्मचारी-अधिकारी व मुकडदम व टोळी मुकडदम शेतकऱ्यांकडे पैसे मागतात. शेतकरी शेतकऱ्यांना लुटायचे काम करत आहेत. हिंदवी जनशक्ती सेना संस्थापक अजय पाटील, साळुंके टुनकी यांना शेतकऱ्यांनी फोन करून कळवले. अजय पाटील साळुंके यांच्या हा प्रकार सगळे लक्षात आल्याने बारामती ॲग्रो चे कर्मचारी-अधिकारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांना ऊस लागवड करून ही ऊस तुटत नाही या कारणाने ऊस जाळून टाकावा अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे. तसेच ऊस तोड कामगार मेळावा यामुळे शेतकऱ्यांना बारामती ऍग्रो कारखान्यावर ती चक्रा मारावे लागत आहे. ज्या कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे व त्यांच्या उसाला तोड लवकर येत नसून तसेच शेतकऱ्यांच्या उसाला आग लागली होती. आठ दिवस झाले असून कारखान्याला वारंवार कळवून देखील ऊसाला तोड आलेले नसून अजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना भेट घेऊन सर्व हकीकत प्रकार सांगून अजय पाटील यांनी व शेतकरी व शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड का आली नाही. बारामतीचे ॲग्रो मुख्य अधिकारी ऑफिस पठाण यांना धारेवर धरून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे. त्यावेळेस उपस्थित शेतकरी सोमनाथ दादा मोरे, संतोष पाटील, गोरे शिवाजी पवार, विजय मिसाळ, राजेंद्र काकडे, विजय रघो, बाळासाहेब बोर्ड सह गावातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते.