जळगाव जिल्हा
राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
मुक्ताईनगर (सचिन झनके) दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी AIMIM राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशातील मेरीट वरून दिल्ली येताना असता त्यांच्यावर पथकर नाक्यावर अज्ञातांनी गोळीबार करण्यात आले. जातीवादी व धर्माथक हल्ला करण्यात आलेला आहे. या भ्याड हल्ल्याचे मुक्ताईनगर मनियार बिरादरीने जाहीर निषेध केला.

तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी असे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदारांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. यावेळी मुक्ताईनगर मनियार बदिरदरी अध्यक्ष हकीम चौधरी, AIMIM अध्यक्ष शाहीद व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



