भाजप ओबीसी मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणची कार्यकारणी जाहीर
जळगाव : “वसंत स्मृती” भाजपा कार्यालय, जळगाव येथे भाजपा ओबीसी मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.संजय महाजन यांनी आज त्यांची जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारिणी मध्ये अध्यक्षांसह आठ उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, आठ चिटणीस, एक कोषाध्यक्ष आणि एक सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख असे एकूण २१ पदाधिकारी आहेत.
यामध्ये अध्यक्ष ॲड.संजय महाजन धरणगाव, उपाध्यक्ष हेमराज फेगडे यावल, नंदलाल सोनार एरंडोल, स्वप्निल बचाके बोदवड, नितीन पाटील भडगाव, कैलास चव्हाण जळगाव ग्रामीण, प्रविण चौधरी चोपडा, संजय पाटील रावेर, सचिन पाटील अमळनेर, सरचिटणीस प्रदिप पाटील पाचोरा, विवेक चौधरी टाकळी चाळीसगाव, चिटणीस विनोद पाटील पारोळा, दिलीप कोल्हे भुसावळ, रविंद्र पाटील पाचोरा, विनायक पाटील चोपडा, अनिल तेली यावल, देवेंद्र पाटील माळशेवगा चाळीसगाव, चेतन टांगळे बोदवड, प्रल्हाद पाटील अमळनेर, कोषाध्यक्ष संजय भोळे जळगाव ग्रामीण, प्रसिद्धी प्रमुख सर्वेश पिंगळे चाळीसगाव यांचा समावेश आहे असे भाजपाचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश माळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भाजपा ओबीसी मोर्चा जळगाव ग्रामीण च्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपा नेते माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजुमामा), विभाग संगठन मंत्री रवोजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अशोकभाऊ कांडेलकर, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष दादा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चंदूभाई पटेल, आ.मंगेश चव्हाण, जनजातीय संपर्क प्रमुख किशोरभाऊ काळकर, बेटी बचाव बेटी पढाओ डॉ. राजेंद्र फडके, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भरत महाजन, जिल्हा संगठन सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, हर्षल पाटील व जिल्हापदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.