जामनेर शहरात वाढत्या महागाई विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन
जामनेर (ईश्वर चौधरी) जामनेर शहरात मोदी सरकार काळात घरगुती गॅस, पेट्रोल, डीजेल आदींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने नगर पालिका चौकात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
डिझेलने शंभरी पार केली असून पेट्रोल १२० रुपयांच्या पुढे गेले. तर घरगुती गॅस एक हजारावर गेले. या महागाईच्या फटक्याने, सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. मोदी सरकारची झोप उडविण्यासाठी व त्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी नगरपालिका चौक येथे जामनेर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी नाद करुन व केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरत पवार, शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक प्रा.ईश्वर चोरडिया, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ, युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी, सुरेश चव्हाण, दिपक माळी, जितू झाल्टे, मयूर राजपूत, देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते.