श्री संत शिवाई माता भंडारा उत्सव मोठ्या थाटात साजरा
शिवूर : श्री संत शिवाई माता भंडारा उत्सव निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या थाटाने भव्यादिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. भंडारा निमित्ताने काल्याचे किर्तन ह भ प श्री भागवताचार्य पंढरीनाथ पगार महाराज यांचे कीर्तन सेवा झाली.

तसेच भंडारा उत्सव निमित्ताने उपस्थित संत महंत ह भ प श्री मधुसूदन मोगल महाराज व श्री ह भ प भोले गिरी, श्री ह भ प रघुनाथ गिरी महाराज, ह भ प संजय शास्त्री महाराज, श्री ह भ प अर्जुन महाराज, गोवशाळा कोल्ही, श्री ह भ प संतोष महाराज नालेगावकर, श्री ह भ प सर्वानंद महाराज मनुर, गोकुळ महाराज वाघचौरे तसेच उपस्थित मान्यवर आमदार रमेश बोरनारे, संत शंकर स्वामी महाराज संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव, सुनील पैठण पगारे, कृषी बाजार समिती राजू भाऊ चव्हाण निमगावकर, सुभाष बापू जाधव, भाजपा युवा तालुकाध्यक्ष अनिल वाणी, राष्ट्रवादीचे अनिल भोसले आबा, चांगदेव जाधव, सुनील बापू शिरोडे व शिवुर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच शिवूर परिसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.




