राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्याकडे तालुक्यातील खाजगी शाळा व महाविद्यालय फी अभावी विध्यार्थ्यांना वेठीस धरत असल्याची सोयगाव प्रहारची तक्रार..
सोयगाव (विवेक महाजन तालुका ,प्रतिनिधी)
सोयगाव : सोयगाव सह तालुक्यातील खाजगी शाळा व महाविद्यालयाकडून शैक्षणिक फी वसुल केल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही यासह तालुक्यातील विविध समस्यांची तक्रार सोयगाव तालुका प्रहारच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिव्यांगांच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोना काळात कर्जबाजारी होऊन मेटाकुटीस आलेला सर्वसामान्य नागरिक व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे गोरगरिबांचे आर्थिक गणित बिघडले असून खाजगी शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याशिवाय पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश होऊ शकत नसल्याने खाजगी शाळा व महाविद्यालयाकडून फी वसुली केल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखल दिला जात नसल्याने सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांचे पुढील शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे फी भरून शाळेचा दाखल देत नसल्याने नाईलाजास्तव त्याच महाविद्यालयात इच्छा नसतांना सुद्धा पैशा अभावी शिक्षण घ्यावे लागत आहे. खाजगी शाळा व महाविद्यालय फी अभावी विद्यार्थ्यांना वेठीस धरत असतील तर त्या शाळा व महाविद्यालया संबंधी प्रहार पदाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन सोयगाव तालुका प्रहारच्या वतीने करण्यात आले आहे.वेताळवाडी धरणाची उंची वाढवून खोलीकरण करण्यात यावे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या हलगर्जीपणा मुळे कार्यालयीन कर्मचारी आठवड्यातून दोन,तीन दिवस ठराविक वेळे पर्यंत कार्यालयात उपस्थित राहतात. त्यानंतर ते माघारी निघून जातात यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व शेतकऱ्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसून औरंगाबाद,सिल्लोड,बुलढाणा,जळगाव जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याने दुपार नंतर कार्यालय ओस पडत आहे.अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी सोयगाव प्रहारने केली आहे. राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष मनोज बयास, तालुका अध्यक्ष सुभाष वाडेकर,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील व अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष संदीप इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
————————————————————————
सोयगाव नगरपंचायत होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्याशी सोयगाव तालुका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. नगरपंचायतच्या सतरा जागा असून सतरा जागा लढविण्यासाठी उमेदवारांची चाचपणी केली असून यादी तयार असल्याची माहिती यावेळी सोयगाव प्रहारच्या वतीने राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आली. सतरा जागा लढविण्यास भाऊंकडून हिरवा कंदील दिला आहे. लवकरच सोयगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे सोयगाव नगरपंचायत निवडणूक प्रहार लढवणार असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.