मालपूर येथे सुभेदार मल्हारराव होळकर जयंती साजरी
मालपुर (गोपाळ कोळी) मालपुर येथील इंदिरा नगर मधील पातालेश्वर चौकात धनगर समाज बांधवांनी सु.मल्हारराव होळकर जयंती धनगर समाजातील जेष्ठ पंचमंडळी व दरबार गडाचे राजे महावीर सिंहजी रावल यांच्या शुभ हस्तश्रीफळ वाहुन फुलहार घालुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्या प्रसंगी जेष्ठ पोपट बागुल, आसाराम निंबा भामरे, मगन ठाकरे, पञकार प्रभाकर आडगाळे, धनगर समाज महासंघाचे धुळे जिल्हा ऊपाध्य रमेश बागुल व अॅडव्होकेट रामकुष्ण धनगर, युवा नेत्तुत्व जयवंत हेमराज पाटील, माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील, धोंडु लांडगे, भटु रावल, ऊत्तम भामरे, रमेश गोराणे, दादाभाई माळी, सुरेश मुजगे, धनराज गोराणे, वसंत गोराणे, पुंजाराम बागुल आदी उपस्थित होते.
धनगर महासंघाचे धुळे जिल्हा ऊपाध्यक्ष रमेश बागुल यांनी सुभेदार मल्हारराव होळकरांचा थैडक्यात आपल्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले कि, मल्हाराव यांनी आपल्या तलवार बाजी च्या जिवावर मुघलना सडो का पडो करुन सोडले. व मराठे सरदारांना बळ दिले. ताराबाई सारख्या शूर विरगणीला बळ मिळाले. असे शुर सुभेदार मल्हारावना जयंती निमित्ताने मानाचा ञिवार मुजरा करतो.