ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियमचे दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेत घवघवीत यश ; तालुक्यात प्रथम
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सलग ५ वर्षापासून तालुक्यात विद्यालयाचा विद्यार्थी प्रथम येत असून ही परंपरा यंदाही कायम आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सत्रनिहाय निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
हर्षदा अनिल सोनवणे ही विद्यार्थिनी ९८.४ टक्के गुण मिळवत विद्यालयात व तालुक्यात प्रथम आली. तर प्रांजल खंडेराव पाटील (९६.८%), चिरायू नितीन पाटील (९४.८%), वेदिका विजय पाटील (९४.४%), प्रणव जितेंद्र चव्हाण (९३.६%) यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले आहेत. तेजस्विनी सुरेश सोनवणे (९२.४%), भावेश मच्छिंद्र सैंदाणे (९०.४%), क्रिष्णा तुकाराम पाटील (९० %) या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडा ९० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. २२ विद्यार्थ्यांना शेकडा ८० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा सौ.आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, समन्वयक नीळकंठ सोनवणे, प्रा. दीनानाथ पाटील, प्राचार्य ममता न्याती, उपप्राचार्य परमेश्वरी राजकुमार यांनी अभिनंदन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उज्वला भट, दीप्ती पाटील, जगदीश पाटील, रुपेश चव्हाण, सादिक शेख, शकील अहमद, जीवन पाटील, अमन पटेल, किरण बडगुजर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.