भगवंताने आपल्याला स्वर्णमयुक दाखविले आहे : सुदर्शन महाराज
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन
वरठाण : आपण गेलेला कोरोनाकाळ फार भयंकर परीस्थिती होती त्यातुन आता सावरत असुन भगवंतांनी स्वर्णमयुक दाखविले असुन जे काही धार्मीक कार्यक्रम करतो ते आपल्या स्वताहाच्या भविष्यासाठी ज्वाजंल्यपुर्ण राहतील हे ज्वाजंल्यपुर्ण व्हावे यासाठी जनतेने सुखी व समृद्दी मानुन घ्यावे असा उपदेश ह.भ.प सुदर्शन महाराज यांनी काल्याच्या कीर्तनावेळी केले
सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह सोहळा सुरु होता कीर्तनकार ह.भ.प. पारस महाराज जैन (बनोटीकर ) ह.भ.प महंत संजीवदास महाराज (सावखेडा) ह.भ.प निलेश महाराज राजपुत (भगवानगड वरठाण ) ह.भ.प सुदाम महाराज सुर्यवंशी( वरठाण ) ह.भ.प कन्हैया महाराज( शेंदुर्णी,) ह.भ.प विश्वनाथ महाराज (वाडेकर ) ह.भ.प जनार्दन महाराज( अरावीकर) यांचे कीर्तन झाले शेवटी गोसेवक सुदर्शन महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले
अभंग
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥ तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥
दहीहंडी लीलाव पद्धतीने फोडण्यात आली असुन मानकरी गणेश जाधव ठरले
व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ह्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहसाठी गावातील भजणी मंडळ,तसेच गणेश मित्र मंडळ,दुर्गा मित्र मंडळ,महाराणा प्रताप मित्र मंडळ व समस्त ग्रामस्त मंडळी सहकार्य केले.