राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे सह ईतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन
सोयगाव : सोयगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे सह ईतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सोयगाव शहरातील सेना भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे,माजी शहर प्रमुख गजानन चौधरी युवासेनेचे अक्षय काळे, ऍड. योगेश पाटील, अमोल मापारी,पप्पू दुसाने, रमेश गव्हाँडे, महेश दुसाने, रऊफ शेख, भगवान वारंगणे, पिंटू देसाई, अशोक खेडेकर आदिंची उपस्थिती होती.
शिवसेनेत प्रवेश घरणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष गणेश क्षीरसागर,हरीश सोहणी, प्रसाद पठाडे, संतोष सोनवणे, अमोल कल्याणकर, सागर काळे आदींचा समावेश आहे.



