महाराष्ट्र

मंथन युवा प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिन साजरा

शहापूर (देविदास भोईर) जागतिक महिला दिन सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा होत आहे आणि याचेच औचित्य साधून मंथन युवा प्रतिष्ठान वासिंद आणि माता रमाई महिला मंडळ वासिंद यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्रमांक ०४ मध्ये जिजामाता नगर वासिंद (पूर्व) येथील समाज हॉलमध्ये महिलांना सक्षामिकिकरण करण्याच्या दृष्टीने अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजेप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण यामधील शिक्षण या विषयावर मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम 2009 या विषयावर RTE मार्गदर्शन कार्यशाळे अंतर्गत अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मार्गदर्शन केले. एकूण 25 महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मार्गदर्शक जालिंदर जगताप साहेब (senior coordinator Barti Pune.) यांनी आर. टी. इ. म्हणजे काय..? याविषयी परिपूर्ण मार्गदर्शन करत महिला दीन खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर त्यांना मूलभूत गरजांमधील शिक्षण आणि आपल्यासाठी भारतीय राज्यघटनने नुसार दिलेले अधिकार समजणे खूप गरजेचे आहे हे समजाऊन सांगितले. तसेच गणेश गुरूनाथ गायकवाड ( NEDCO Cluster Head Thane District) यांनी फक्त एक दिवस महिला दीन साजरा न करता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले तर खऱ्या अर्थाने आपण रोजच महिला दीन साजरा करू शकतो असे मत व्यक्त केले. तसेच बदललेल्या शिक्षण पद्धतीचे विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्न मंजुषा स्वरूपात प्रश्नांची योग्य ती उकल करण्यात आली.

या कार्यक्रमात दिनेश शेलार, आनंद गायकवाड, सिद्धार्थ साळवे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आशाताई जाधव, कविता सुनील जाधव, यांनी परिश्रम घेतले. तर मंडळाच्या सचिव पौर्णिमा गायकवाड यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांभाळत उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेला उपस्थितानी महीला दिनानिमित अशा संविधानिक कार्यक्रमाची माहिती मिळाल्याबद्दल मार्गदर्शकांचे आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे