साक्री शहरात विविध भागात बोरवेलचे कामास प्रारंभ
साक्री : गेल्या अनेक वर्षापासून साक्री शहराला भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याने तसेच या वेळेस भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता नगरपंचायती वर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ जिल्हा नेते अमरिशभाई पटेल यांनी साखरी शहरातील जनतेच्या पाण्याची समस्या त्वरित दूर होण्यासाठी शहर व कॉलनी परिसरात स्वखर्चाने बोर करून देण्याचे घोषित केले असून त्याची सुरुवातही करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एका नदीच्या काठावर असलेल्या विहिरीला आडवे बोर अमरिशभाई पटेल यांनी स्वखर्चाने करून दिले आहेत तसेच शिवाजीनगर गोपाळ नगर गडी भिलाटी भोई गल्ली जुने अमरधाम बोर बंद भिलाटी छोरिया टाऊनशिप येते कूपनलिका स्वखर्चाने खोदून देण्यात येणार आहेत. यासाठी साक्री नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांनी युद्धपातळीवर कामही सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शिरपूर येथील सेवानिवृत्त अभियंता गिरासे यांनी साखरी शहरात त्याचा सर्वे करून जिथे जिथे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी ओपन आली का करण्याचे सुचवले होते. दातरती येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची ही त्यांनी पाहणी केली असून येथील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यावरही पाणीपुरवठा सभापती रेखा आ बा सोनवणे यांनी त्यावर काम करणे सुरू केले आहे. त्यामुळे साखरे शहरातील पाणी टंचाई यावेळेस निश्चित दूर होणार आहे. यासाठी साक्रीकर जनतेने सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष जयश्री हेमंत पवार उपनगराध्यक्ष तथा गटनेते बापूसाहेब गीते यांनी केले आहे. साक्री नगरपंचायत पाणीटंचाईवर तातडीने निधी खर्च करू न शकल्याने त्याचा भार सामाजिक दायित्व म्हणून अमरिशभाई पटेल यांनी उचलले आहे. त्यासाठी शेतकी संघाचे चेअरमन विलासराव बिरारीस, पंचायत समितीचे माजी सदस्य उत्पल नांद्रे, लक्ष्मीकांत, ललित आरुजा, बबलू नांद्रे, रमेश सरग, विजय ठाकरे यांनीही सहकार्य केले आहे.