महाराष्ट्र

Daily Horoscope : जाणून घ्या आजचे राशिभविष्य, सोमवार ११ एप्रिल २०२२ !

मेष :- थोडेसे प्रयत्न आणि खूपसा संवाद यांतून तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडतील. कामासाठी तुम्ही परदेशी जाण्याचं नियोजन करत असाल, तर येत्या काही महिन्यांता तुम्ही ते करू शकता. रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक काहीशी सुधारणा दर्शवेल.

वृषभ :- तुम्ही काही काळापासून इंटरव्ह्यूज देत असाल आणि योग्य ती संधी मिळाली नसेल, तर तुम्हाला कदाचित आणखी काही काळ थांबावं लागू शकतं. सध्या घरगुती मुद्द्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल. काही पाहुणे लवकरच येऊ शकतात. रेग्युलर फिटनेस रूटीन कायम ठेवावं.

मिथुन :- तुम्हाला आतून अस्वस्थ, गोंधळल्यासारखं वाटत असेल, तर मेडिटेशन तुम्हाला मदत करू शकतं. काही विचार स्थिर होऊ द्यावेत आणि काही विचार पूर्णतः काढून टाकावेत. एखाद्याच्या कमेंटमुळे तुम्ही दुखावले गेले असाल, तर त्यांना क्षमा करा आणि तुम्ही विसरून जा.

कर्क :- एखादी रोमँटिक व्यक्ती आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला त्यावर विचार करण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास खूप कमी वेळ असेल. संबंधित व्यक्ती टिकून राहणारा प्रभाव पाडून जाईल. सरकारी नोकरीत असाल, तर आव्हानात्मक काळ येतोय. कारण अतिरिक्त काम येऊ शकेल.

सिंह :- तुम्ही खूप डेडिकेटेड असल्याने तुम्ही जे काही करता, त्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. मागणी आणि पुरवठा यांत सध्या गोंधळ असल्याचा अनुभव घेत असाल. तुम्ही स्वतःला काही वेळ देण्याची गरज आहे.

कन्या :- चांगल्या कामाला वेळ लागतो आणि तुम्ही थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. खूप चांगले रिझल्ट्स मिळतील अशी अपेक्षा न करता खाली मान घालून काम करत राहणं सध्या श्रेयस्कर. क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना काही संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

तुळ :- एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुमचा चांगला मित्र तुमच्याकडे सल्ला मागू शकेल. कोणी तरी तुमच्या कामाचं, व्यक्तिमत्त्वाचं दुरून कौतुक करत आहे. आता ती व्यक्ती तुमच्याशी संपर्कही साधेल. स्वतः खात्री केल्याशिवाय बाकीच्या व्यक्ती काय म्हणताहेत याकडे लक्ष देऊ नये.

वृश्चिक :- तुम्ही तुमच्या टीमसाठी हार्ड टास्कमास्टर असाल, तर रिझल्ट्सही आश्चर्यकारकच असतील. ज्यांचं मत महत्त्वाचं आहे, अशा व्यक्तींकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या जोडीदाराच्या काही समस्या असू शकतील आणि त्या सोडवण्यासाठी तातडीने चर्चा करण्याची गरज आहे.

धनु :- जी गोष्ट तुमच्यासाठी मौल्यवान आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक राखली पाहिजे. तुम्हाला सध्या विश्वासार्हतेबद्दलही काही समस्या असू शकेल. किंवा कदाचित कामाच्या ठिकाणी अचानक घडलेल्या काही घटनांमुळे तुम्हाला अडचण येऊ शकेल. बदली किंवा स्थलांतराचे संकेत आहेत. छोट्या अंतरासाठी प्रवास करू शकाल.

मकर :- तुमच्या स्टफमुळे काही समस्या निर्माण होतील, कदाचित काही कायदेशीर अडचणीही येतील. कौटुंबिक पातळीवर एखादी चांगली बातमी मिळेल. मुलांचं कौतुक होईल. अपचनाची समस्या उद्भवण्याचे संकेत आहेत.

कुंभ :- तुमचा जगण्याचा उत्साह सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. अनेकांना याचं आश्चर्य वाटतं, की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम कसं राखू शकता. एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही मिस करत आहात; पण संवाद साधण्याचीही तुम्हाला भीती वाटत आहे. एक्प्रेसिव्ह होणं मदतीचं ठरू शकेल.

मीन :- सातत्यपूर्ण प्रयत्नच तुम्हाला हवे ते रिझल्ट्स देऊ शकतील. प्रयत्नांसोबतच तुमची इच्छाशक्ती आणि सातत्य या गोष्टीही हव्यात. कोणतीही कार्यालयीन कागदपत्रं, करार आदींवर सह्या करताना खूप काळजीपूर्वक करा.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे