सोलापुरात श्री कालिका देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न
सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे विश्वब्राम्हण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट , शुक्रवार पेठ सोलापूर यांचे वतीने श्री कालिका मंदिर शुक्रवार पेठ येथे दि.28 मार्च 2022 ते 6 मार्च 2022 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उदा -उत्सव मूर्ती स्थापना, ग्रंथ पूजा सौ व श्री संजय सुभाष आष्टीकर यांचे हस्ते दुर्गा सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, रुद्राभिषेक, नवचंडी यज्ञ.
दिनांक 6 मार्च रोजी पंचमी दिवशी श्री देवीस महाभिषेक करण्यात येऊन नंतर शहरातील प्रमुख मार्गे श्री कालिका देवीचे पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ” पूरंत ” सहभागी झाले होते. मिरवणुकी नंतर पालखी सोहळा मंदिरात पोहोचल्यावर पुनः श्री देवीची महा मंगल आरती होऊन, प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या वर्षी श्री विश्वकर्मा महिला मंडळ यांनी सर्व महिला मंडळ, महिलांना श्री देवी साठी पूजा आरती सेट आणि नैवेद्य सेट अडीच किलो चांदीचे सेट अर्पण करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील महिला भगिनी, महिला मंडळ यांचेकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यामुळे देवीस चांदी सेट अर्पण करणे शक्य झाल्याचे सांगून विश्वस्त सचिन आष्टीकर आणि संतोष कळमणकर यांनी सर्व देणगीदारांची नांवे वाचून दाखविले आणि सर्वप्रति कृतज्ञता व्यक्त करून प्रातिनिधिक स्वरूपात एक किलो चांदी आणि अर्धा किलो चांदी देवीस अर्पण केल्याबद्दल अनुक्रमे प्रा. अश्विनी पंडीत व सूर्यकांत पंडीत झरेगावकर आणि इंदापुरचे सराफ संजय किसनराव बानकर यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव उमेश कुरुलकर यांनी प्रास्ताविक करून गेली दोन वर्षे. कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. यंदा मात्र श्री देवीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जात असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेशराव महामुनी रोपळकर यांनी संस्थेचा सन 1897 ते 2022 या कालावधीचा धावता आढावा घेऊन श्री कालिका देवी सिरसंगी बाबत विस्तृतपणे माहिती दिली. तदनंतर श्री देवीस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. लिलावाचे कामकाज माजी अध्यक्ष संतोष कळमणकर यांनी मोठया उत्साहात पार पाडले , महिला भक्तांनी सदर लिलावात मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने भाग घेतला .
कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थित पणे करून संपन्न केल्याबद्दल उत्सव समिती अध्यक्ष श्यामराव काळे आणि सर्व सदस्यांना संतोष कळमणकर यांनी धन्यवाद दिले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कालिका मंदिरात श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी भक्त गण मोठी गर्दी केली होती. महाप्रसाद नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.