संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात उद्योजकता केंद्रास मंजुरी
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीने सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात उद्योजकता केंद्राची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या धोरणानुसार महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते राज्यभरातील पन्नास महाविद्यालयास उद्योजकता केंद्राची मंजुरी देण्यात आली आहे त्यात सोयगाव येथील महाविद्यालयास देखील उद्योजकता केंद्राची मंजुरी मिळाली आहे या केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय ज्ञान दिले जाते अशी माहिती महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. कुरपटवार लक्ष्मीनारायण यांनी दिली यावेळी त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी अंभोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रंगनाथ(नाना) काळे व सचिव श्री प्रकाश दादा काळे यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, डॉ.रावसाहेब बारोटे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.