राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पेट्रोल पंपाचे उद्घाटन संपन्न
सिल्लोड (विवेक महाजन) पेट्रोल डिझेल ची दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारने जर ठरविले तर सामान्यांना परवडेल तसेच दिलासा देणारे पेट्रोल डिझेल चे भाव असतील असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पेट्रोल पंपाच्या उदघाटन प्रसंगी केले.
केऱ्हाळा फाटा ता. सिल्लोड येथे गुरुवार (दि.१३) रोजी पांडुरंग जीवरग यांच्या जीवरग पाटील पेट्रोल पंपाचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, पंचायत समितीच्या माजी सभापती कुशिवार्ताबाई बडक, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, अनिल काळे, शिवनाथ महाराज, अक्षय मगर, परमेश्वर जीवरग पेट्रोल पंपाच्या संचालिका पद्माबाई पांडुरंग जीवरग, पांडुरंग जीवरग आदींची उपस्थिती होती.