शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंच आयोजित भिल महासंमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
शिंदखेडा (यादवराव सावंत) भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित भिल महासंमेलन अकरा एप्रिल रोजी होत असुन महासंमेलनाची जय्यत तयारी सुरू असून भव्य दिव्य मंडपाची उभारणी करण्यात सुरुवात झाली आहे.
सदरचे भिल महासंमेलन शिंदखेडा येथील विरदेल रोड साईलीला नगर येथे अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी यांच्या हस्ते तर महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष सिमाताई वडवी तर विशेष अतिथी माजी मंत्री पदमाकर वळवी व माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार गावीत उपस्थित राहणार आहे. ऐतिहासिक भिल महासंमेलनाची जोरदार तयारी सुरू असून अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे महासंमेलनाचे आयोजन आहे. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपरा पदाधिकारी व कार्यकर्ते पिंजुन काढला असुन भिल समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.हया भव्य दिव्य भिल महासंमेलनाच्या मंडपाची उभारणी काम सुरू झाले आहे.हयासाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यासह जिल्हा सचिव अशोक सोनवणे , गणेश सोनवणे , चंद्रकांत सोनवणे, बापुजी फुले .राजेश मालचे , सुनील सोनवणे, शामा ठाकरे , भाऊसाहेब मालचे , पावबा ठाकरे ,कालु मोरे, पांडु मोरे, बापू ठाकरे, अशोक ठाकरे, किरण चित्ते , भरत पाटील आदी परिश्रम घेत आहे. धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा येथे होणाऱ्या ऐतिहासिक भिल महासंमेलनासाठी महाराष्ट्र राज्यातील भिल समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक सदस्य तथा नगरसेवक चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे.