शिंदखेडा तालुक्यातील दोडायचा येथील शहर भाजपच्या वतीने भाजपा स्थापना दिनी मोतीबिंदू शिबिर संपन्न
मोतीबिंदू शिबीर घेऊन प्रवीण महाजन यांनी सेवाभावी वुत्ती दाखवली-उद्योगपती सरकारसाहेब रावल
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा शहर भाजपच्या वतीने भाजपा वर्धापन दिनानिमित्त मोतिबिंदू शिबीर घेऊन दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी सेवाभाव वृत्ती दाखवली असे गौरवोद्गार सरकारसाहेब रावल यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मोतीबिंदू शिबीर तपासणी प्रसंगी काढले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रदीप कागणे, माजी नगरसेवक हितेंद्र महाले ,भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.यावेळी आपल्या मनोगतपर भाषण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले. त्यानंतर शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी आपल्या मार्गदर्शपर भाषणात सांगितले की,भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नविन वर्षाच्या दिवशी झाली.
पक्षाचे २ खासदारापासुन आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विश्वात वेगळी ओळख निर्माण करीत स्थान निर्माण केले आहे .भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा वर्धापन दिन विविध सेवा कार्यक्रम राबवुन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहर , प्रविण आय क्लिनिक दोंडाईचा व शंकरा आय हॉस्पिटल आनंद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रविण आय क्लिनिक रोटरी मार्ग दोंडाईचा येथे मोतिबिंदू चिकीत्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होत आहे. असे भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले. तसेच शिबिरात यावेळी एकुण १३९ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात ११० मोतिबिंदू रुग्ण आढळले. आज ५५ मोतीबिंदू रुग्णांना आनंद येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. उर्वरित ५५ रुग्णांना २० एप्रील रोजी रवाना करण्यात येईल.
शेवटी शिबिर यशस्वीतेसाठी भाजपा सरचिटणीस कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भाजपा महिला आघाडी प्रमुख शेख इशरत बानो, चंद्रकला सिसोदिया, इंदिरा रावल नगरसेवक प्रदीप कागणे, किशनभाई दोधेजा, विजय मराठे नरेंद्र गिरासे, बापू तमखाने, पंकज चौधरी,जी.के.राजपूत देवा पाटील, महेंद्र माळी, अनिल सिसोदिया, मुकेश देवरे, सुनिल शिंदे, अशोक चौधरी, सुभाष धनगर, महेश धनगर, राकेश अग्रवाल, पी. के. चौधरी, रामनाथ मालचे, एच.पी.गिरासे, ज्ञानेश्वर गिरासे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे .