राजकीय

सिल्लोड येथे युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सिल्लोड : येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी युवासैनिकांनी ध्येय समोर ठेवून बळकट मोर्चे बांधणी करावी असे आवाहन युवासेना मराठवाडा विभागीय सचिव अभिमन्यू खोतकर यांनी सिल्लोड येथे केले. तर येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट करीत पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष पणे आपली जबाबदारी पार पाडत प्रत्येक जागेवर भगवा फडकविण्यासाठी युवासैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड येथील महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे युवासेनेचे अभिमन्यू खोतकर व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार (दि.7) रोजी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करीत असतांना अभिमन्यू खोतकर व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर बोलत होते.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव , शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, युवासेना जिल्हा चिटणीस शेख इम्रान ( गुड्डू ) युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय मगर, युवासेना तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, जालना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, सुरेश तळेकर , तालुका समनव्यक समाधान गोंगे, प्रवीण मिरकर, यांच्यासह नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, मतीन देशमुख, प्रशांत क्षीरसागर, बबलू पठाण, युवासेनेचे पदाधिकारी रवी गायकवाड, एकनाथ शिंदे, अकिल देशमुख, आशिष कुलकर्णी, बापू पा. काकडे, योगेश शिंदे, पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, पानवडोद उपसरपंच प्रमोद दौड, फहिम पठाण, संजय मुरकुटे , संदीप हाडोळे , नारायण हाडोळे, गणेश डकले, महेश पाटील, स्वप्नील शेळके, दीपक वाघ, रुपेश जैस्वाल, वैभव बन्सोड, रणजित सपकाळ, कैलास इंगे, रामेश्वर सुरडकर, गफ्फार शेख, परमेश्वर वाघ, विष्णू अपार, संग्राम राजपूत, सुभाष जाधव, रिजवान मुलतानी, अमित कळम, शेख अस्लम, सोमनाथ जंजाळ, शुभम जंजाळ, आरेफ शेख, अजहर मुलतानी, अफताफ शेख, योगेश दिवटे, वाहेद शेख, महादू खंबाट, सलीम पठाण, गोरख अक्कलकर, किरण तायडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी तालुका शिवसेनेने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजपचे किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला निधीच काय झालं असा सवाल करीत सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला जमा न करता त्या पैशाचा स्वतःच्या कामासाठी खर्च केल्याचा आरोप शिवसेना युवासेनेने निवेदनात केला. किरीट सोमय्याने देशवासियांचा विश्वास घात करीत देशाची गद्दारी केल्याने किरीट सोमय्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी तालुका शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे