सुलवाडे जामफळ योजनेचे पाणी कापडणे, नगाव परिसरातील १० गावांना मिळावे : आ. कुणाल पाटील
धुळे (करण ठाकरे) सुलवाडे जामफळ कानोली सिंचन योजनेतुन कापडणे-नगाव परिसरातील १० गावातील सिंचन क्षेत्राला पाणी द्यावे अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानभवनात लक्षवेधी मांडतांना केली होती. त्यानुसार याकरीता पुर्नसव्हें करण्याच्या सूचना देऊ व त्यातून जेवढे पाणी उपलब्ध करून देता येईल तेवढे पाणी त्या दहा गावांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी विधानभवनात सांगितले असल्याची माहिती आ. कुणाल पाटील यांनी दिली आहे. वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे परिसरातील शेतकर्यांना पुरेसा मोबदला देण्याचीही मागणी यावेळी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे. मोबदला देतांना एकाही प्रकल्पबाधित शेतकर्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन ना. जयंतराव पाटील यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यात होणार्या सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून उदभणारे प्रश्न आणि मागणीच्या प्रश्नावर दि. १५ मार्च रोजी नियम १०५ नुसार लक्षवेधी सुचना मांडली. त्यात आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे जिल्ह्यात तापी नदीवरील सुलवाडेबॅरेजवरुन सुलवाडे- जामफळ कानोली उपसा सिंचन योजना हा सिंचनातील महत्वपूर्ण प्रकल्प आकारास येत आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला गती दिली असून लवकरच पूर्णत्वास येईल. या सिंचन योजनेमुळे जिल्हयातील ३० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी एकूण २५ कोटी रुपये एवढा खर्च येत आहे. दरम्यान या योजनेचा आराखडा तयार करतांना कालव्यातून तलाव भरण्याचे व शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन होते मात्र नंतर त्यात बदल करुन बंद पाईपलाईनव्दारे पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आणि सदर काम प्रगतीपथावरही आहे. पाईपलाईनव्दारे पाणी देतांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन अतिरिक्त पाणीसाठा वाचणार आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी धुळे तालुक्यातील दापुरा, सरबड़, लोणकुटे, कापडणे, धमाणे, धमाणी, नगाव, बिलाडी, कुंडाणे, वरखेडे, व बाळापुर या १० गावातील शेती क्षेत्रातील बंधारे व तलाव भरुन घेतल्यास शेतकर्यांचे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होवून या भागातील दुष्काळ दूर करण्यास मदत होणार आहे. म्हणून या १० गावांना सुलवडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजनेतून सिंचनासाठी पाणी देण्यासाठी नियोजित प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून १० गावांच्या बंधार्यात पाणी टाकावेअशी मागणी केली. तसेच यावेळी आपली लक्षवेधी मांडतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, सुलवाडे – जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेत प्रकल्पबाधित होणारे धुळे ताल क्यातील वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे या गावातील शेती संपादित करण्यात आली आहे मात्र प्रकल्पबाधित शेतकर्यांना अत्यल्प मोबदला जाहिर झाला आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा, फळझाडे, घरे, विहीरी, बोअरवेल, शेड यासह सुटलेल्या विविध मालमत्तेचे नव्याने मुल्यमापन करून वाढीव दर देऊन योग्य तो मोबदला देण्यात यावा अशीही मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली.
यावेळी आ. कुणाल पाटील यांनीमांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील म्हणाले कि, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन । योजनेचा आराखडा बनवतांना कालव्याव्दारे लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्याचे नियोजित करण्यात आले होते मात्र मंजुरी देतांना त्यात बदल करून पाईपलाईनमधुन पाणी देण्याचा 1 निर्णय झाला त्यामुळे मला खात्री आहे कि, काही पाणी शिल्लक असेल आणि जे पाणी वाचेल ते आ. पाटील यांनी मागणी I केल्यानुसार १० गावांना पुरत असेल तर निश्चितपणे दिले जाईल. यासाठी पुर्नसव्हें करण्याच्या सुचना देण्यात येतील तसे आदेश निर्गमित करण्याचीही व्यवस्था लगेच करतो. दरम्यान बेल्हाणे, कुंडाणे, बाबरे येथीलशेतकर्यांची जमीन या योजनेत संपादित करण्यात आली आहे. मात्र प्रकल्पबाधित शेतकर्यांकडून होणारी वाढीव मोबदल्याची मागणी आणि सुटलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करण्याबाबत पर्याय शोधून विशेष बाब म्हणून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री ना. जयंत पाटील यांनी सांगितले. आ. कुणाल पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे धुळे तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकर्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तर कापडणे, नगाव या परिसरातील १० गावांना सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून अतिरिक्त पाणी देण्यासाठी सर्व्हे होणार असल्याने शेतकयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.