भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण जिल्हा बैठक संपन्न
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी कार्यालय “वसंत स्मृती” येथे माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन व जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाकडून आलेल्या आगामी काळात घेण्यात येणाऱ्या ८ कार्यक्रमांच्या विषयांवर चर्चा झाली. त्यात १) पक्षाची संघटनात्मक रचना पुर्ण करणे. २) बुथ समिती 1+30 पूर्ण करणे. ३) पन्ना (पेज) समिती ४) “मन की बात”-“बूथ बैठक के साथ” ५) सुदृढ बालिका/बालक स्पर्धा ६) समर्पण 7) कमलपुष्प ८) खेल कुंभ (खासदार चषक) या ८ विषयांचा समावेश आहेत.
या बैठकीला खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेषदादा पाटील, ना. रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील, किसानमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, जिल्हा उपाध्यक्ष पि.सी. आबा पाटील, राकेश पाटील, नंदुभाऊ महाजन, प्रल्हाद पाटील, संगठन सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, दिपक साखरे, अमित देशमुख, रवींद्र पाटील, आनंद सपकाळे, गणेश माळी, प्रकाश पंडित ई. उपस्थित होते.