जळगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात
वैजापूर : जळगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाली आहे.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह संगीत भागवत कथा जळगाव येथे सुरू झाल्या निमित्ताने भागवत कथा व्यासपीठ परम पूज्य आचार्य 1008 स्वामी शतानंदजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून सर्व भक्तांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे श्रवण करत आहेत शतानंदजी महाराज यांनी आपल्याला जन्म देणारी आपले संगोपन करणारी जरी आई असली तरी आपण भगवंताचे नामस्मरण चिंतन केले पाहिजे जेणेकरून आपला उद्धार होईल असे महाराजांनी सांगितले.
तसेच 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी आठ ते नऊ बाबाजींच्या पालखीची मिरवणूक नंतर दहा ते बारा ह भ प महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट यांचे काल्याचे किर्तन होईल. नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल म्हणून जळगाव ग्रामस्थांच्यावतीने व सप्ताह कमिटीच्या वतीने भागाठाण आगाठाण भिसे वाडी, गोडवाडी, दहेगाव, पालखेड समस्त गावकऱ्यांनी कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.