महाराष्ट्र
लासूर गावामधील आराध्य दैवत दाक्षायणी मातेच्या यात्रेला सुरुवात
वैजापूर : सालाबादाप्रमाणे याही वर्षी लासूर गावामधील आराध्य दैवत दाक्षायणी मातेच्या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळामध्ये सतत 2 वर्षापासून दक्षयानी मातेची यात्रा रद्द करण्यात येत होती. यात्रेला भाविक भक्त लाखोच्या संख्येने दर्शनासाठी येतात म्हणून कोरोना काळामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लासूर दाक्षायणी माता ट्रस्ट च्या वतीने व शासन निर्णय असल्यामुळे दोन वर्ष यात्रा बंद होती. चालू वर्षी यात्रेची मोठ्या उत्साहात तयारी झाली असून लासुर दक्षिणी मातेची यात्रेला सुरुवात झाली आहे. तरी दाक्षायणी देवी मातेच्या ट्रस्टच्यावतीने वैजापूर गंगापूर खुलताबाद तालुक्यातील सर्व भक्तांना दर्शनासाठी व यात्रेसाठी यावे असे ट्रस्टच्यावतीने आवाहन केले.