जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टरतर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला रेशन किट वाटप
चोपडा (विश्वास वाडे) जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टरतर्फे शनिवारी कम्युनिटी हॉलला कॅन्सर ग्रस्त परिवाराला रेशन किट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शहरातील पत्रकार, उपजिल्हा रुग्णालयतील डॉक्टरांचा, करोना योद्धा म्हणून सम्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी केले व संस्थे द्वारे चालविले जाणारे उपक्रमा विषयी माहिती दिली व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली या वेळी कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले ,तालुका आरोग्यधिकारी डॉ प्रदीप लासुरकर ,डॉ सुरेश पाटिल, पुरुषोत्तम मामु ,पत्रकार चंद्रकांत पाटील, सचिन जयस्वाल ,उमेश नगराळे, छोटू वारडे, राजेंद्र पाटील, फारूक शाह नोमानी, आर डी पाटील, विश्वास वाडे, उमाकांत गायकवाड, डॉ. जावेद शेख, संदीप ओली, आदींचा सम्मान करण्यात आला या वेळी कॅन्सर ग्रस्त परिवार ला रेशन किट देण्यात आले व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यामधे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलीक यांनी आपले मनोगतात बोलताना राज मोहम्मद चे कार्याची प्रशंशा केली व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मनोगतात बोलताना अरुणभाई गुजराथी यांनी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर द्वारे केली जाणारी कॅन्सर ग्रस्त परिवाराची सेवा व मदद ,मार्गदर्शन प्रशसनीय आहे. राज मोहम्मद शिकलगर द्वारा आता पर्यंत 800 पेशनटची मदद व व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात 350 च्या वरती लोकांना व्यसन्मुक्त करने एक कॅन्सर पेशनट ने केलेला कार्य उत्तम आणि नावलौकिक मिळवणारे आहे. आपण अशीच सेवा करावी व आपल्याला दृढ आयुष्य मिळावा यासाठी सुभेच्छा दिले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष जिवन भाऊ चौधरी, हितेंद्र देशमुख ,असगर अली सय्यद, हुसेन खान पठाण,नगरसेवक राजाराम पाटील, रमेश शिंदे, गजेंद्र जयस्वाल,हाजी हनिफ अब्दुल सत्तार, पंचायत समितीचे माजी सभापती भरत पाटील, हाजी आसिफ सय्यद, जाबिर शेख, हाजी शब्बीर खान शिकलगर, समशेर खान शिकलगर, सादिक खान शिकलगर, युनूस जनाब,सुरमाज फौंडेशन चे उस्मान शेख ,नोमान काजी, शेख कालू रहेमतुला आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी अकिल जहागीरदार, जलीस अहेमद इंजिनिअर, सय्यद महमूद, कासीम पेंटर, सिराज खान शिकलगर, आरिफ शिकलगर, शरीफ खान आदीनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अब्दूलहक सर यांनी केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.