तरुणाचा संशयास्पद मृत्यू : परिसरात खळबळ
जामनेर (अमोल बावस्कर) तालुक्यातील कापूसवाडी येथील ३८ वर्षीय तरुणाचा शेताच्या बांधावर मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याचा आरोप मृत्य तरुणांच्या नातेवाईकांनी केला असून पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तम रघुनाथ धोनी (वय-३८) असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, कापुसवाडी येथील उत्तम रघुनाथ धोनी यांच्याकडे गावातील एका इसमाचे पैशाचा व्यवहार होता. त्याबाबत वेळोवेळी दोघांमध्ये भांडण झाले होते. ६ एप्रिल रोजी कापुसवाडी येथे एका उत्तरकार्याचा कार्यक्रमांमध्ये पैशाच्या कारणावरून मयत संजय एकनाथ पाटील व सहा-सात जणांमध्ये वाद होऊन उत्तम धोनी यांना मारहाण झाली. यामुळे मयत उत्तम धोनी यांना अपमान वाटला व त्यांनी चार चाकी वाहन घेऊन शेताकडे निघाला. रात्री घरी परतला नाही त्यामुळे पत्नी व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता बुधवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उत्तम धोनी यांचा मृतदेह विजय उबाळे यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून. जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तम रघुनाथ धोनी यांना मृत घोषीत केले. याबाबत जामनेर पोलिसात डॉ.आर.के.पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही आत्महत्या आहे की घातपात असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पतीचा घातपात केल्याचा आरोप मयत उत्तम धोनीची यांच्या पत्नीने केला असून या संदर्भात पोलीसांनी गावातील पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.



