राजकीय
नेवासा तालुक्यातील युवकांचा व महिलांचा ‘आप’ मध्ये जाहीर प्रवेश
अमरावती (महेंद्रसिंग पवार) आम आदमी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नेवाशातील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते अक्षय धनवटे यांनी आपल्या कार्यकर्त्या सहित आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, पक्ष प्रवक्ते ऍड.प्रविण जमधडे यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला.