राजकीय
खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला मोठा निर्णय
वैजापूर : एकीकडे सर्वसामान्य महिला व्यसनाधीन झालेल्या पती मुलगा यांना वैतागले असता दवाखान्यात पैसे खर्च करून दारू सोडण्यासाठी उपचार करत आहे व त्यामध्येच महाराष्ट्र सरकारच्या या नवीन लज्जत पदी निर्णयाच्या धोरणामुळे आता किराणा दुकान मध्ये वाईन म्हणजे दारू मिळेल असा हा आगळा वेगळा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
व्यसनाधीन व्यक्तींना आणखीन व्यसनात पडणार म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून ही अधिसूचना लोकांना स्टोअरमध्ये वाईनच्या विक्री बद्दल त्यांचे मत देण्यास सांगितले व माझे मत सोपे आहे तुम्ही विक्री करा आम्ही दुकाना तोडतो व महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील सर्व महिलांनी उघडपणे समोर यावे असे आव्हान औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांनी केले.