महाराष्ट्र
सेना भवन येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन
सोयगाव : सोयगाव येथील महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे हिंदुहृदयसम्राट , शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे यांच्याहस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे,शिवसेना शहर समन्वयक अक्षय काळे,युवासेना शहर प्रमुख अमोल मापारी,रमेश गवांडे ,शेख जावेद,गजानन चौधरी,जीवन पाटील,भगवान वारंगने,संदीप चौधरी, दिपक पगारे, योगेश नागपुरे, शरीफ शहा, शेख मुनाफ, किशोर मापारी, रविंद्र जावळे, जाकीर देशमुख, शाम एंडॊले , राजेश सोनवणे, जितेश चणाल,समाधान काळे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.