ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय सहन करून घेणार नाही : विद्यार्थी सेवक निलेश देशमुख
खामगाव (निलेश इंगळे) तालुक्यातील आयटीआय मध्ये प्रभारी कारभार चालतोय. कवेलू उचलण्यासाठी विद्यार्थ्यावर भार दिला. गेल्या अनेक दिवसांपासून इमारतीच्या मागील बाजूला कवले पडलेली होती ही कवले सदर विद्यार्थ्यांनी, का उचलली खामगाव तालुक्यात तापमान 44 अंश वर असून एवढा भर उन्हात विद्यार्थ्यांकडून काम करून घेणे ही चुकीची गोष्ट असून या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी यांच्यावतीने आम्ही तीव्र आंदोलन करू, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचे आयटीआय कॉलेजमध्ये लेक्चर होतं नसुन याकडे प्राचार्यांनी लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात वेळोवेळी तक्रार केली. परंतु, आयटीआय कॉलेजमधील काही शिक्षक लोक विद्यार्थ्यांना धमकावत असून असले काम जर करुन घेत असतील तर शिक्षण सोडून असे काम करत असतील तर विद्यार्थ्यावर अन्याय सहन करून घेणार नाही, असा इशारा विद्यार्थी सेवक निलेश देशमुख यांनी दिला.