महाराष्ट्र

शिंदखेडा येथे विज वितरण कार्यालयात शेतकऱ्याचा मोर्चा ; उद्रेक उप अभियंतास निवेदन

शेती पंपासाठी विज सुरळीत करण्याची शेतकऱ्याची मागणी

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विज वितरण कार्यालयात तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उप अभियंता विजय बोरसे यांना निवेदन देण्यात आले. सुरुवातीला शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर शिवाजी चौफुलीपासुन विज वितरण कार्यालयात पायी जावुन अधिकारी विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत थेट मोर्चा काढण्यात आला.

यावेळी उपअभियंता विजय बोरसे यांना निवेदन देवुन शेतकऱ्यानी चांगले धारेवर धरले. तालुक्यात शेती पंपासाठी विज ठरलेल्या वेळी सुरळीत विजपुरवठा करण्यात यावे.रब्बी हंगामातील पिकांचे शेवटच्या पिकांना पाणी भरणा सुरू असून अगदी हातातोंडाशी आलेल्या पिंकाना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यानी अवाढव्य खर्च करून आतापर्यंत वाढवलेले पिके पाण्या अभावी करपू लागली आहेत. शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध असुनही विजेअभावी पाणी भरणा होत नाही.कारण रात्र पाळी कि दिवस पाळी विज पुरवठा ठरलेल्या वेळेत पूर्ण वेळ विजपुरवठा होत नाही. त्यामुळे आधीच कर्जबाजारी शेतकरी ला शेतात उत्पन्न काढणे देखील कठीण झाले आहे. विज वितरण अधिकारी यांच्या अडमुठे धोरणामुळे त्रास सहन करावा लागत आहे.म्हणुन ठरलेल्या वेळेनुसार निदान आठ तास विजपुरवठा विनाखंडित मिळाला पाहिजे.अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.हे फक्त आजच्या कमी संख्येने मोर्चा काढला होता.मात्र हयाची दखल संबंधित अधिकारी नी न घेतल्यास तिव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.व सर्वस्वी जबाबदारी कार्यालयाची राहिल. यावेळी प्रकाश नाना चौधरी, संजय माळी, राजेंद्र माळी, सुभाष माळी, आधार पाटील, गणेश खलाणे, प्रवीण माळी, सुनील पाटील, राजेंद्र राऊळ, विठ्ठल पाटील, वसंत पाटील, कृष्णा माळी, संजय गिरासे यासह शेकडोंच्या संख्येने तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे