माळी सागज येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त विजयघोष व मिठाई वाटून फेरी काढण्यात आली
वैजापूर (भिमसिंग कहाटे) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त वैजापूर तालुक्यातील माळी सागज येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी गावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजीने हातात पक्षाचा ध्वज घेवून पक्षाचा विजयघोष व मिठाई वाटून फेरी काढण्यात आली. नंतर मारोती मंदिरात सामूहिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन सामूहिक रित्या सर्वांनी ऐकले.
या कार्यक्रमासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व घायगाव जिप गटाचे प्रभारी नबी पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने पटेल यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ग्राम पंचायत सदस्य मच्छिंद्र रोटे व पुंजाराम फाळके यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. या निमित्ताने गावामधे सुरू असलेले संत सावता महाराज मंदिर बांधकामासाठी पटेल यांनी 51000रू रोख स्वरूपात देणगी दिली. त्यांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी रामदास गाडेकर, शरद गाडेकर, रमेश गाडेकर, बाबासाहेब पवार, भास्कर पवार, आसाराम फाळके, बाळू घोडके, आकाश पवार, सागर रोटे आदी कार्यकर्त्यां बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग.पं. सदस्य दिपक गाडेकर यांनी केले.