महाराष्ट्र
शिंदखेडा तहसिल कार्यालयात आधार सेंटरचे उदघाटन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील तहसीलदार कार्यालयात जिल्हा सेतु सोसायटी व महा आयटी महाराष्ट्र शासन या शासनाच्या उपक्रमांतर्गत आधार सेंटर सुरू झाले असून या आधार सेंटरचे उद्घाटन शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आधार सेंटर मध्ये नवीन आधार कार्ड काढणे नूतनीकरण करणे नावात बदल व दुरुस्ती जन्मतारखेत बदल व दुरुस्ती आदी बाबी शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहेत तालुक्यातील जनतेसाठी आधार सेंटर चे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी मंडळ अधिकारी आर. एच. कोळी , तलाठी तुषार पवार, पोलीस पाटील संघटनेचे पंकज बाळू मालचे, आधार केंद्र संचालक विनायक पवार, ऑपरेटर सुरेश बोरसे, समाधान मराठे, यादवराव सावंत, पाष्टे येथील ग्रामपंचायतीचे भालचंद्र पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.