सटाणा न्यायालय इमारतीसाठी निधी मंजूर
सटाणा (संभाजी सावंत) सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांची भेट घेवून निवेदन दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या माध्यमातुन संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पंडितबापू भदाणे, उपाध्यक्ष ॲड.एन.पी.चंद्रात्रे, सचिव ॲड.आर.एम.जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदिप आहिरे, वकील संघाचे सदस्य ॲड.सी.एन.पवार, ॲड.पी.के.गोसावी आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.
विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवीन इमारतीबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना.भुजबळ यांनी यावेळी दिले होते. त्याचा पाठपुरावा लगेचच करत पालकमंत्री ना.भुजबळ यांच्या माध्यमातली महाविकास आघाडी सरकारने सटाणा न्यायालय ईमारतीसाठी १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधीची तरतुद करुन दिली आहे.