१५ वित्त आयोगाच्या निधीतून बोरद येथे हातपंप सुरू
बोरद (योगेश गोसावी) बोरद गावाचे पंचायत समिती सदस्य विजय राणा यांच्या १५ व्या वित्त आयोगातून बोरद येथे सन २०१९ व २०२०, २१ यातून पाच हजार लिटर क्षमतेचे दोन हात पंप मंजूर करून ते सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे बोरद येथील गावकऱ्यांनी व परिसरातील येणाऱ्या पादचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

बोरक पंचायत समिती सदस्य विजय राणा यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बोरद वार्ड नंबर २ येथील छोटा धनपूर रस्त्यावर व वार्ड नंबर ३ मधील गुरांच्या दवाखाण्या जवळ पाच हजार लिटर क्षमतेचे दुहेरी हात पंप सुरू करण्यात आले. सदरील पाण्याची टाकी शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी व पादचाऱ्यांसाठी आपत्कालीन वेळी खूप वरदान ठरणार आहे. याबाबत उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता ती टाकी मोठ्या उपयोगात पडत आहे. त्यामुळे बोरद येथे येणाऱ्या छोटाधनपूर, न्यूबन, लाखापूर, मालदा तुळाजा, कर्डे, गोंडाळा, बन, जुबानी, सेलिंगपूर व बोरद या साठी मोठे वरदान ठरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.



