महाराष्ट्र
तहसील कार्यालयात आ. गिरीश महाजनांच्या हस्ते दिव्यांग बांधवाना राष्ट्रीय कुटुंब लाभ धनादेश व अंत्योदय योजनेच्या कार्डाचे वाटप
जामनेर (ईश्वर चौधरी) जामनेर तालुक्यातील व शहरातील दिव्यांग बांधवाना अंत्योदय योजनेतून धान्यांची योजना शासनाने आणली त्यानुसार नगरपालिका व ग्राम पंचायतीतून पात्र लाभार्थीयांचे ठराव तहसील कार्यालयाला देण्यात आले.
त्यानुसार पात्र लाभार्थीयांची निवड करण्यात आली. यावेळी लाभार्थीयांना अंत्योदय योजनेचे कार्ड व राष्ट्रीय कुटुंबाचे धनादेश माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जामनेर तहसीलचे तहसीलदार अरुण शेवाडे, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्राचार्य. शरद पाटील, पुरोठाधिकारी पवार नाना, मनसेचे जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.