महाराष्ट्र
पाटचारी फुटल्याने शेतकऱ्यांचे झाले नुकसान
वालखेडा (गोपाल कोळी) वालखेडा शिवार येथे किशोर भिला पाटील रा. वाघोदे यांच्या शेत शिवार आहे. गट नंबर 441 ड यांचे शेतात मका पिक घेतले होते. सदर पाटचारीला पाणी सोडण्यात आल्याने पाटचारी फुटुन शेतात सर्व पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांना सांगुन सुध्दा लक्ष देत नाही.
या वर्षातच पाच ते दहा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वारंवार पाटबंधारे आॅफिस ला फोटो व बातमी देत राहतात. तरी सुद्धा अधिकारी लोक दुर्लक्ष करतात. पाटचारीच्या सुधारणा होत नाही म्हणुन शेतकरी बांधवांनी जन आंदोलन करू व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा प्रकाश पाटील (संचालक डि.डि.सी. बॅंक व सरपंच डोंगरगाव) व शेतकरी बांधवांनी असा इशारा दिला आहे.