महाराष्ट्र
भगवान करनकाळ यांची नंदनगरीत सदिच्छा भेट
नंदुरबार (प्रतिनिधी) येत्या 8 मे रोजी धुळे शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यानिमित्त धुळे महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशिय तालीम संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भगवान बापू करनकाळ यांनी शनिवारी नंदनगरीत सदिच्छा भेट दिली.
यावेळी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या निवासस्थानी औपचारिक चर्चा करण्यात आली.कुस्ती क्षेत्राची आवड असलेल्या जुन्या आणि नव्या मल्ल व पैलवानांचे संघटन करून नंदुरबार जिल्ह्याची स्वतंत्र कार्यकारणी गठित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटी प्रसंगी धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाचे जिल्हा सचिव युवराज चौधरी आणि सहसचिव रामेश्वर चौधरी उपस्थित होते.