तऱ्हावद विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध
बोरद (योगेश गोसावी) तऱ्हावद विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित तऱ्हावद तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार व्यवस्थापक समिती ची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सन २०२१,२२ते २०२५, २६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी रमेश लोखंडे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने तऱ्हावद आणि खेडले ही विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित तऱ्हावद ता. तळोदा या नावाने संयुक्तरित्या ओळखली जाते. या ठिकाणी दोन्ही गावाच्या सभासद मंडळाने एकत्र येत निवडणूक बिनविरोध कशी घेता येईल या दिशेने चर्चात्मक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विरोधक आणि संचालक मंडळ यांनी संगनमताने एकूण १२ नावांची घोषणा याठिकाणी केली आणि या १२ नावांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने १२ जण बिनविरोध घोषित होणार असल्याचे जवळ पास निश्चित झाले आहे. ज्या १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी म्हणून पाटील सुरेश राजाराम, पाटील सुभाष भगवान, पाटील शिवनाथ जगन्नाथ, पाटील रमेश रघुनाथ, चौधरी देविदास विठ्ठल पाटील, दशराम विठ्ठल पाटील ,पाटील भरत शंकर, गोसावी नंदलाल शंकरपुरी, महिला प्रतिनिधी म्हणून पाटील सीमा शांतीलाल ,मिराबाई तुंबडू पाटील, इतर मागास प्रतिनिधी म्हणून पाटील गणेश राजाराम, भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी म्हणून गोसावी विलास बन्सीपुरी यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. फक्त घोषणाच बाकी आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पाडावी यासाठी दोन्ही गावांचे प्रतिनिधी एकत्र आले.