महाराष्ट्र
कै दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिला गणिताचा पेपर
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील कै दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मध्ये गणित विषयाची तयारी करून पेपर दिला. गणित विषयासाठी पेपरला बसलेले विद्यार्थी संख्या 25 होती. कोरोनामुळे शासन निर्णय असल्यामुळे मुख्य सेंटर शिवराई अंतर्गत सब सेंटर दहेगाव येथे परीक्षा घेण्यात आली.
तसेच केंद्र संचालक शेख यांनी मुलांना बजावून सांगितले की, आपल्या पब्लिक स्कूल चे नाव लौकिक करणे हे तुमच्या हातात आहे म्हणून कोणीही चीटिंग किंवा कॉफी करताना आढळल्यास त्याला रेस तिकीट केले जाईल, असा आदेश देण्यात आला व तिथे सहकेंद्र संचालक काचकर, रणर कदम उपस्थित होते. तसेच मुलांच्या भविष्यासाठी कोविड लसीकरण देण्यात आली. जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत डॉक्टर प्रविण मेशराम शिवानी गायकवाड व आशा सेविका सागर होत्या.