आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
कुरुकवाडे गावात शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
मालपुर (गोपाल कोळी) आज रोजी कुरुकवाडे गावात शिवजयंती निमित्त कुरवाडे ग्रामपंचायत व सावता परिषद धुळे जिल्हा च्या संयुक्त वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश लोले, के डी गिरासे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष सावता परिषद ईश्वर राजेंद्र माळी, तालुका अध्यक्ष परमेश्वर माळी, दोंडाईचा शहर अध्यक्ष भाऊसाहेब माळी, कुरुकवाडे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ईश्वर भाऊ माळी यांचा वाढदिवसाचा सत्कार करताना सतीश लोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विशाल माळी कुरुकवाडे यांनी केले आहे.