पा बा मा विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
शिरपुर (ॠषिकेश शिंपी) येथील पां.वा.मा. म्यु. हायस्कुल शिरपुर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतीशिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के पी कुलकर्णी होते. सुरवातील मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक ए एस कानडे, पर्यवेक्षक के एन काजी, एस आर गवळी, अधीक्षक जे बी जाधव, जेष्ठ शिक्षक एस एस पावरा, ए एच कोळी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता ९ वी चा विद्यार्थी मनिष सैंदाणे याने पोवाडा सादर केला. विद्यालयातील शिक्षक पी बी वारुळे यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज याचा गौरवशाली इतिहास मांडला. यावेळी आजादी का अमृतमहोत्सव निमित्त आयोजित रांगोळी देशभक्ती व लोरी स्पर्धेत सहभागी पी बी बोरसे, एस एस वसावे, एम एन जैन, पी के पाटील, सुरेन्द्र पावरा, जे एस सोनवणे, एम पी चव्हाण, जे एन महाजन यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी एच के पाटील, बी ए मोरे, जे जी महाजन यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन ए एस कानडे यांनी केले तर आभार ए एस कानडे यांनी केले.